एशियन गेम्सच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने पराभव केल्यानंतर नेपाळचा क्रिकेट संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारताने 23 धावांनी विजय मिळवला.
यशस्वी जयस्वालने नेपाळविरोधात 49 चेंडूत शतक ठोकत तुफानी खेळी केली.
नेपाळकडून दीपेंद्र सिंह ऐरी याने जबरदस्त फलंदाजी केली. 4 षटकारांच्या मदतीने त्याने 32 धावा केल्या.
दीपेंद्र सिंह ऐरीने भारताविरोधात 4 षटकार ठोकत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
दीपेंद्र सिंह ऐरी जगातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चौकार न लगावता 13 षटकार लगावले.
दीपेंद्रने मंगोलियाविरोधात 8 षटकार लगावले होते. यानंतर त्याने मालदीवविरोधात 1 षटकार आणि भारताविरोधात 4 षटकार ठोकले.
दीपेंद्र सिंह ऐरी महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे. त्याची खेळीही धोनीप्रमाणेच आहे. नेपाळ संघाचा फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं.