हे बटाट्यासारखं दिसणारं कंदमुळ आरोग्यासाठी खजिना
रताळं हे बटाट्यासारखे दिसणारे कंदमुळ आहे. या रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
रताळं खाल्यानं बुद्धी तल्लक होते आणि स्मृती वाढण्यास मदत मिळते.
रताळ्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, व्हिटॅमिन यांसारखे अनेक पोषकतत्व असतात.
रताळी खाल्ल्यानं मेंदू वेगवान होतो. रताळ्यामध्ये डायोजेनिन (Diosgenin) कंपाउंड असतात त्यामुळे न्यूरोनची वाढ होण्यास मदत मिळते.
रताळ्याचे सेवन केल्यामुळे बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. यामुळे हृदयाशी निगडीत समस्या कमी होतात.
रताळं खाल्ल्यानं कर्करोगासारख्या भयानक समस्यांवरही उपयुक्त ठरतात, असं तज्ज्ञ म्हणतात.
रताळं पोटासाठी देखील लाभदायक असतं. रताळ्यामुळे बद्धकोष्ठसारख्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यात फायदा मिळतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)