चहा हा अनेकांचा जिन्हाळ्याचं विषय आहे. दररोज सकाळ संध्याकाळ अनेकांना हमखास चहा लागतो.
चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं म्हणून काही चहाप्रेमी तर दिवसातून 3 ते 4 वेळा चहा पितात.
हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्या अनेकांना आवडतं. आल्याचा चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
तेव्हा चहा करताना त्यात आलं नेमकं कधी टाकावं याविषयी जाणून घेऊयात.
तुम्ही चहापत्ती टाकण्यापूर्वीच आलं ठेचून किंवा किसून पाण्यात टाकू शकता आणि मग 2-3 मिनट त्याला उकळी काढू शकता.
याशिवाय चहापत्ती सोबतच आलं देखील पाण्यात टाकू शकता आणि एका भांड्यात हे 3 ते 5 मिनिटं उकळू शकता.
मग चहा उकळली की त्यात दूध टाकून थोडावेळ भांड्यावर झाकण ठेवा. अशा प्रकारे तुमचा आल्याचा फक्कड चहा बनून तयार होईल ज्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
जास्त चहा प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात, तसेच दातांच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात. तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)