प्रत्येक नात्यात भांडणं होतात. तुम्ही ऐकलं असेल की जिथे प्रेम आहे तिथे भांडण होतातच.
पण तुमच्या नात्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त होत असतील तर तुमचं नातं धोक्यात आहे.
जर तुमचा पार्टनर तुम्ही काही सांगत असताना त्यावर फक्त हो, हम्म अशी उत्तर देत असेल तर तुमच्या पार्टनरला तुमचा कंटाळ आला आहे.
जर तुमचा पार्टनर छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असेल तर तुमच्या नात्यात दुरावा आला आहे.
जर तुमचा पार्टनर तुम्हाला एकही प्रश्न विचारत नसेल तर त्याला तुमच्या बोलण्याचा फरक पडत नाहीये.
जर तुमचा पार्टनर त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही असं सांगत असेल तर समजून जा त्याला आता या नातं संपवायचं आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)