इन्स्टाग्रामवर या ठिकाणी टच करताच आता मजेदार गेम सुरु होतील. जाणून घ्या पद्धत.
सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम अॅप ओपन करा.
त्यानंतर तुम्ही इन्स्टाग्राममधील चॅट ऑप्शनवर क्लिक करा. चॅट ऑप्शनवर गेल्यानंतर कोणत्याही एका चॅटवर क्लिक करा.
त्यानंतर चॅटमध्ये त्या व्यक्तीला एक इमोजी पाठवा. त्यानंतर त्या इमोजीला स्पर्श करा.
यानंतर लगेच तुमच्या फोनच्या स्क्रीनवर एक गेम सुरु होईल. ज्यामध्ये तुम्हाला एक बॉल दिसेल.
तो बॉल तुम्हाला खाली पडण्यापासून वाचवायचा आहे. जर हा चेंडू खाली पडला तर गेम तिथेच थांबेल.