पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांमुळे आजारपण वाढते. पावसाळ्यात जलजन्य आजार आणि त्यामधून विषबाधा होण्याची शक्यता असते. अशा काही भाज्या आहेत ज्यांच पावसाळ्यात सेवन करणं आरोग्यासाठी महागात पडू शकतं.
पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांमुळे आजारांचा धोका वाढतो.त्यामुळे पावसाळ्यात भाज्या खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
डॉ. मकरंद कुमार मिश्रा असं सांगतात की, पावसाळ्यात भाज्यांमध्ये अनेक प्रकारच्या कीटकांची निर्मिती होत असते. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.
त्याचप्रमाणे क्रूसीफेरस भाज्या म्हणजेच कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांच सेवन करणं टाळावं. कारण पावसाळ्यात या भाज्यांमध्ये सर्वाधित आर्द्रता आढळते. यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची बुरशीनाशके तयार होतात.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या, कोबी या भाजांचे सेवन कमी करावे.जर तुम्हाला त्या भाजांचे सेवन करायचे असेल तर चांगल्या पद्धतीने धुवून, उकळून खावेत.
डॉ. मकरंद सांगतात की याव्यतिरिक्त जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्यांचे सेवन देखील टाळावे.पावसाळ्यात या भाज्या अधिक प्रमाणात ओलसर होतात ज्यामुळे त्यावर जास्त कीटकनाशक राहण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मशरूम खाणं देखील धोक्याचे आहे.