'या' 5 लोकांपासून दूर राहिलात तर खूप प्रगती कराल! चाणक्यचा हा सल्ला तुमच्या आयुष्याला देईल कलाटणी

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

महान विचारवंतांपैकी

आचार्य चाणक्य यांना सर्वात महान विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडे आजही एक आदर्श मार्गदर्शक म्हणूनही पाहिलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

अनेक विषयांचं ज्ञान

चाणक्य यांना अर्थशास्त्रापासून ते समाजशास्त्रपार्यंत अनेक विषयांचं ज्ञान होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

आजही त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिलं जातं

चाणक्य यांनी रचलेल्या अनेक नीति आजही आवर्जून फॉलो केल्या जातात. त्यांच्या या नीति आजही अनेकजण मार्गदर्शनासाठी वापरतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

या पाच व्यक्तींपासून दूर रहावं

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार यशस्वी होण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे हे जाणून घेऊयात...

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

पहिला प्रकार

आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींबरोबर मैत्री करु नये असं चाणक्य सांगतात. अशा लोकांपासून दूर राहण्याचा ते सल्ला देतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

दुसरा प्रकार

वाईट संगत असलेल्या लोकांपासून दूर रहावं. असे लोक आपल्या यशामध्ये अडथळा ठरु शकतात, असं चाणक्य म्हणतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

तिसरा प्रकार

मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलं चांगलं. अशा लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

चौथा प्रकार

सतत नकारात्मक गोष्टी करणाऱ्यांपासून चार हात दूर राहणं फायद्याचं ठरतं, असं चाणक्य म्हणतात. असे लोक स्वत: प्रगती करत नाही आणि इतरांनाही करु देत नाहीत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

पाचवा प्रकार

कठीण काळात तुमची साथ सोडून जाणाऱ्यांपासून दूर राहणं अधिक हिताचं ठरतं, असं चाणक्यनीति सांगते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 06, 2024

VIEW ALL

Read Next Story