जास्त तिखट खायला आवडतं? होऊ शकतात 'या' समस्या

तेजश्री गायकवाड
Dec 04,2024


अनेकांना एकदा मसालेदार आणि तिखट खायला आवडते.


परंतु जास्त तिखट पदार्थ खाणे हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

अतिसार होणे

तिखट अन्न तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून जात असल्याने ते पचनाचा वेग वाढवू शकतो. यामुळे अतिसार, तसेच आतड्यांदरम्यान वेदना होऊ शकतात.

डोकेदुखी होऊ शकते

खूप मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर थंडरक्लॅप डोकेदुखी होऊ शकते. हा डोकेदुखीचा प्रकार आहे जो वेदनादायक असतो आणि अचानक सुरु होतो.

जठरासंबंधी समस्या

दीर्घकाळापर्यंत मोठ्या प्रमाणात मसालेदार अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा इतर जठरासंबंधी समस्या होऊ शकतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story