खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायमाचा अभाव त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढत आहे.
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास काय लक्षणं दिसतात जाणून घ्या.
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास उष्माघाताची समस्या जाणवते. चेहऱ्यावर उष्णतेमुळे घामोळ्या येतात.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास चेहऱ्याचा रंग बदलतो. चेहऱ्याचा रंग काळसर वाटतो. शिवाय पुरळ येतात.
शरीराला खाज सुटते आणि त्यामुळे अनेक समस्या जाणवतात.
नाक आणि डोळ्यांजवळ पुरळ येतात. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
सिरोसिसची समस्या जाणवते. त्वचा कोरडे होते आणि खाज सुटते आणि रक्तस्त्राव होतो.
हात पायांच्या त्वचेवर वेदना जाणवते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)