हिवाळ्यात पेरू खाण्याची मजाच काही और असते. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना पेरू खायला आवडतो. पण पेरू खाल्ल्यानंतर चुकूनही काही गोष्टी टाळा नाही तर फायद्याऐवजी नुकसान होईल.
पेरू खाल्ल्यामुळे वजन कमी होतं असं म्हणतात. पण पेरू खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी प्यायल्यास तुम्हाला घशाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो.
पेरूचे सेवन केल्यानंतर चुकूनही दुधाचं सेवन करु नका. यामुळे पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस आणि डायरिया त्रास तुम्हाला होऊ शकतो.
अनेकांना एकत्र अनेक फळं खायची सवय असते. जर तुम्ही पेरु खाणार असाल तर त्यासोबत केळीचं सेवन करु नका.
पेरूसोबत दह्याचे सेवन तुमच्यासाठी हानीकारक आहे. तुम्हाला उलट्या होण्याचीही शक्यता असून पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.
पेरू खाल्ल्यानंतर ताक खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास दीर्घकाळ होतो. पोटदुखी, मळमळ आणि उलटीच्या समस्येलाही होऊ शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)