शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलची बॉर्डरलाईन किती?

Published by: Zee Team | Feb 08, 2024

खराब लाईफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येतेय. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे संबंधित व्यक्तीला विविध त्रास मागे लागण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलर मानलं जातं. तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्रॉलची हाय बॉर्डरलाईन किती आहे? तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल ही लिपिड प्रोफाइल टेस्टच्या माध्यामातून समजते.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL 100 पेक्षा कमी असेल तर कोणतीही समस्या नसल्याचं मानलं जातं.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

जर तुम्ही हार्ट पेशंट आहात आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणती आरोग्यासंबंधी समस्या नसेल आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल 130 ते 159 mg/dL असेल तर बॉर्डरलाईन कोलेस्ट्रॉल मानलं जातं.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

जर तुमचं कोलेस्ट्रॉल 160 ते 189 mg/dL असेल तर ते हाय आणि धोकादायक या लिस्टमध्ये समाविष्ट होतं. यापेक्षा जास्त म्हणजे, 190 पेक्षा ज्यांचं कोलेस्ट्रॉल अधिक असतं, त्यांच्या आरोग्यासाठी ही धोक्याची पातळी आहे.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

VIEW ALL

Read Next Story