भारतीय खाद्यसंस्कृतीत हिरव्या मिरच्यांना मोठं महत्त्व आहे. गावाकडे न्याहारीसाठी भाकरीसोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा हा खाल्ला जातो.
जेवणाची लज्जत वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी देखील हिरव्या फायदेशीर ठरतात.
हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमीन सी आणि सी जास्त प्रमाणात असंत. त्यामुळे आहारात हिरव्या मिरच्यांचा समावेश असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते रक्तातील पेशी वाढण्यास फायदेशीर ठरतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचा आहारात सेवन करु शकता.
हिरव्या मिरच्यांमुळे पचनसंस्था सुधारते तसंच, शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी हिरव्या मिरच्यांचं सेवन फायदेशीर ठरतं.
तज्ज्ञांच्या मते, हिरव्या मिरच्यांमध्ये capsaicin नावाचा घटक आढळतो. यामुळे कोलेस्टोरॉलची पातळी कमी होते.
गॅसची समस्या वारंवार जाणवत असल्यास हिरव्या मिरच्यांमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील हिरव्या मिरच्या फायदेशीर ठरतात. हिरवी मिरची खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मूड सुधारण्यास मदत होते.
हिरव्या मिरच्यांचं आहारात प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोजच्या आहारात 12 ते 15 ग्रॅम हिरवी मिरच्या मिरची सेवन करणं फायदेशीर आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)