अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काय खावं?

Jun 30,2024


सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थांचं सेवन केल्यास आपल्या अ‍ॅसिडिटीसह पोटाचे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.


आहार तज्ज्ञांनुसार सकाळी रिकाम्या पोटी सर्वत्र प्रथम दोन ग्लास पाणी प्यावं. कोमट पाणी पिणेही चांगल आहे.


त्यानंतर पपई, टरबूज आणि सफरचंद या सारख्या फळांनी सुरुवात करावी.


रात्रभर भिजवलेले बदाम आणि काळा मनुकाचं सेवनही तुम्ही करु शकता.


लिंबू, शहद आणि पाण्याचा सेवन रिकाम्या पोटी करा.


भरपूर लोह, व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे खनिज युक्त आवळा रसाचं सेवनही तुम्ही करु शकता.


चिया सिड्स किंवा सब्जाचा पाणीही तुम्ही सकाळी उठल्यावर घेऊ शकता.


रिकाम्या पोटी लापशी किंवा दलिया आणि ओट्सचं सेवन हे उत्तम असतं. यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.


रिकाम्या पोटी कॉफी, चहा, मसालेदार पदार्थ, आंबट फळं, जास्त फायबरयुक्त पदार्थ आणि कोल्ड्रिंक्सचं सेवन चुकूनही करु नका. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story