वर्किंग वुमन आहात? 'या' आरोग्यदायी टिफिन रेसिपी जाणून घ्या

तेजश्री गायकवाड
Dec 12,2024


तुम्ही जर ऑफिसला जाणारा महिला असाल आणि सकाळी घाईत टिफिनला काय घेऊन जायचे समजत नसेल तर आम्ही तुमची मदत करतो.


वर्किंग वुमनसाठी काही हेल्दी आणि टेस्टी टिफिन आयडिया जाणून घ्या. ज्या झटपट तयारही होतील.

व्हेजिटेबल ओट्स उपमा

व्हेजिटेबल ओट्स उपमा हा एक उत्तम पर्याय आहे. फायबर समृद्ध ओट्स केवळ पाचन सुधारत नाहीत तर यामुळे दिवसभर ऊर्जावान देखील वाटते.

मूग डाळ चिला

मूग डाळ भिजवून बारीक करून त्यात चिरलेल्या भाज्या घालून बनवलेला चिला हा टेस्टी पर्याय आहे. हा पदार्थ प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

पोहे पुलाव

पोहे धुवून त्यात वाटाणा, गाजर, कांदे, टोमॅटो अशा भाज्या घालून परतून घ्या. शेंगदाणे आणि लिंबाचा रस घाला. ही एक हलकी आणि आरोग्यदायी टिफिन रेसिपी आहे.

चपाती रोल

पनीर भुर्जी, मिक्स्ड व्हेज किंवा हिरव्या भाज्यांसोबत चपाती करा. ते रोल करून पॅक करा. हे पटकन तयार होते आणि पौष्टिकतेने भरलेले असते.

दलिया खिचडी

हलक्या मसाल्यांमध्ये भाज्यांसह दलिया शिजवा. हे हलके आणि सहज पचणारे अन्न आहे, जे हिवाळ्यातही शरीराला उबदार ठेवते.

VIEW ALL

Read Next Story