आपण कोंबडीची अंडी सर्रास खातो, पण तुम्हाला माहितीये का इतरही पक्ष्यांची अंडी शरीरासाठी फायद्याची ठरतात.
पक्षीच काय, तर माशाची अंडीसुद्धा शरीराला लाभदायी असतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटामिन D आणि प्रथिनांची पुरेशी मात्रा असते.
बदकाच्या अंड्यांमध्ये विटामिन D आणि एंटीऑक्सीडेंट्ससह ओमेगा 3 भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळं ही अंडीही फायद्याची.
क्वेल पक्ष्याच्या अंड्यांमध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि एंटीऑक्सीडेंट्स प्रचंड प्रमाणात असल्यामुळं ही अंडीही तुम्ही खाऊ शकता. पण, क्वेलची अंडी सहजासहजी मिळणं कठीण.
टर्कीच्या अंड्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असून, कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी असतं.
हंस, goose ची अंडी विटामिन B12, लोह, फॉलिक अॅसिड आणि विटामिन D नं परिपूर्ण असतात.
एमू पक्ष्याच्या अंड्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्ससोबतच प्रोटीन, विटामिन A, विटामिन B12 आणि लोहाचं जास्त प्रमाण असतं.
जाणून आश्चर्य वाटेल पण, शहामृगाचं एक अंड कोंबडीच्या 20 अंड्यांइतकं मोठं असतं.