रात्री, मध्यरात्री फोनवर चुकूनही करु नका हे काम; जीवही जाऊ शकतो

स्मार्टफोन मुलभूत गरज

स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या आयुष्याचा मुलभूत भाग झाला आहे. मित्रांचे मेसेज, ऑफिसच्या गप्पा ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टींसाठी स्मार्टफोन वापरला जातो.

जीवाला धोका

अनेक लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर करत असतात. पण यामुळे आपण जीवाला धोका निर्माण करत असतो.

तुम्ही रात्री फोन वापरता का?

जर तुम्ही रात्री, मध्यरात्री स्मार्टफोनता वापर करत असाल किंवा उशीखाली, चार्जिंगला लावून झोपत असाल तर हे फार धोकादायक आहे.

फोनचा होऊ शकतो स्फोट

काही लोक उशाखाली किंवा बेडच्या शेजारी मोबाईल ठेवून झोपतात. पण अशावेळी मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होण्याची भीती असते.

मोबाईल उशाखाली ठेवणं जीवघेणं

स्मार्टफोन चार्जिंग करताना उशी किंवा चादरीच्या खाली ठेवल्यास व्हेंटिलेशन मिळत नाही. यामुळे मोबाईल तापतो आणि बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. तसं झाल्यास तुमचा जीव जावू शकतो.

Apple चा इशारा

Apple ने काही दिवसांपूर्वी अॅडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये त्यांनी चार्जिंग करताना मोबाईल उशाखाली किंवा इतर कोणत्या वस्तूखाली ठेवू नये अशी सूचना केली होती. अशाने बॅटरी फुटू शकते.

चार्जिंगदरम्यान काय होतं?

चार्जिंग करताना अनेकदा मोबाईल गरम होतो. कारण त्यावेळी एनर्जी ट्रान्सफर होत असते. यादरम्यान काही मोबाईल जास्त हिट जनरेट करतात.

अनेकांनी गमावला आहे जीव

यावर्षी केरळच्या थ्रिसूरमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन एका 8 वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला होता. मोबाईल चार्जिंग होताना मुलीच्या हातात होता अशी माहिती आहे.

अजिबात करु नका हे काम

अनेक लोक मोबाईल चार्जिंगला असतानाच त्यावेळी कॉलवर बोलत असतात. पण असं केल्यास मोबाईलमध्ये वेगाने हिट जनरेट होते. ज्यामुळेही बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story