उन्हाळ्यात थंड मँगो शेक प्यायला प्रत्येकाला आवडतो. मँगो शेक पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कारण मँगो शेकमध्ये आंबा, दूध आणि काजू हे पदार्थ असतात. पण मँगो शेक काही लोकांसाठी हानिकारक आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी मँगो शेक पिऊ नये. यामुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मँगो शेकपासून दूर राहावे. कारण दूध, साखर आणि आंबा या तिन्ही गोष्टी वजन वाढवतात.
तुम्हाला ॲलर्जी आणि पिंपल्सचा त्रास होत असेल तर मँगो शेक पिऊ नका.
ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांनी मँगो शेक पिऊ नये.