ब्रा घालून झोपावं की काढून?

जाणून घ्या ब्रामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याचे धोके काय...

user Swapnil Ghangale
user Aug 30,2023

योग्य आकाराची ब्रा वापरणं फार महत्त्वाचं

शरीराला सुडौल ठेवण्यासाठी योग्य आकाराची ब्रा वापरणं महत्त्वाचं असतं.

हा ही फायदा

ब्रामुळे केवळ स्तन सुडौल राहतात असं नाही तर यामुळे पर्सनॅलिटी सुधारण्यासही मदत होते.

ब्रा घालून झोपणं योग्य आहे का?

मात्र रात्री झोपतानाही ब्रा घालून झोपणं योग्य आहे का?

सैल ब्रा घालून झोपावं

तज्ज्ञांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनी थोडी सैल ब्रा घालून झोपल्यास काहीही अडचण नसते.

ब्रा काढून झोपणं फायद्याचं

मात्र घट्ट ब्रा वापरणाऱ्या महिलांनी ब्रा काढूनच झोपलेलं आरोग्यासाठी फायद्याचं असतं, असं तज्ज्ञ सांगतात.

अनेक आरोग्यविषयक समस्या

रात्री घट्ट ब्रा घालून झोपल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या आणि अडचणी निर्माण होतात. त्या कोणत्या पाहूयात..

फंगल इन्फेक्शनचा धोका

घट्ट ब्रा घालून झोपल्यास स्तनांजवळच्या त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

छातीला खाज येणे

घट्ट ब्रामुळे छातीला खाज येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. ही खाज येण्याची समस्या केवळ रात्रीपुरती नाही तर दिवसाही त्रादायक ठरु शकते.

रक्ताभिसरणावरही परिणाम

घट्ट ब्रा घालून झोपल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक व्याधींचा त्रास भविष्यात होण्याचा धोका वाढतो.

कॅन्सरचा धोका

घट्ट ब्रा घालून झोपण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story