झोपेत शरीर जडं वाटतंय का? वेळीच सावध व्हा; स्लीप पॅरालिसिसची लक्षणं जाणून घ्या


स्लीप पॅरालिसिस या आजाराने पिडित लोकांची संख्या आजकाल वाढत चालली आहे. या स्थितीत व्यक्तीला शरीर हलवता येत नाही. स्लीप पॅरालिसिसच्या पिडिताला भास होतात, घाबरायला होते, जाग येत असताना उठून बसणे, बोलणे काहीच करता येत नाही. अशा माणसाला अस्वस्थ व्हायला होते.


स्लीप पॅरालिसिस कोणालाही होऊ शकतो. जर लक्षणे माहीत असतील तरच आपण आजारावर लवकर मात आणि उपचार करु शकतो. ही मुख्य लक्षणे आहेत जी स्लीप पॅरालिसिसच्या पिडितांमध्ये अढळून येतात.


थोड्या थोड्या वेळाने काही सेकंदांसाठी हा त्रास उद्भवतो. परत शरीर पुर्ववत होते. पण काही वेळाने पुन्हा शरीर स्तब्ध होते. सामान्यपणे रात्रभर हा असाच त्रास सुरु राहतो.


या दरम्यान तुम्ही जागे आहात असे तुम्हाला वाटते मात्र जागे असूनही हलचाल करणे शक्य होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी शरीर साथ देत नाही असे वाटते.


स्लीप पॅरालिसिसचा परीणाम ह्रदयावर होतो. या स्थितीत भीती वाटते आणि घाबरल्यामुळे छातीवर जोर पडतो. यामुळे पॅनिक अॅटॅक येतो. श्वास घ्यायला त्रास होतो.


स्लीप पॅरालिसिसमध्ये विविध भास होतात. खस करुन लोकांना आजुबाजूला लोकं दिसतात. त्यांना अस्तित्त्वात नसलेल्या शक्तींची उपस्थिती जाणवते. एवढंच नाही तर त्यांचा स्पर्श जाणवतो आणि मग सगळं सत्य आहे असे वाटायला लागते.


काहीतरी विपरीत घडणार आहे असे वाटायला लागते. भीती वाढतंच जाते. कोणीतरी आपल्याला हानी पोहचवू इच्छिते असे वाटायला लागते. रडावेसे वाटते पण रडू येत नाही.


तुम्ही व्यवस्थित जागे असता पण हलता येत नाही. आजुबाजूला काय चालले आहे ते समजत असते मात्र प्रतिसाद देता येत नाही. असहाय्य असल्यासाखे वाटते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story