पैशांचं नियोजन करणं महत्वाचं

पैसा कितीही मिळाल तरी तो कमीच असतो असं म्हणतात. मात्र हातातील पैशांचं नियोजन करणंही तितकेच महत्त्वाचे असते.

8 गोष्टी महत्त्वाच्या

घरात आणि खिशात पैसा टिकावा म्हणून काही गोष्टींची अंमलबजावणी केली तर त्याचा फार फायदा होतो. या 8 गोष्टी कोणत्या हे पाहूयात...

1) तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवा

पैसा वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही नेमका कुठे आणि किती पैसा खर्च करता याचा हिशेब ठेवा. असं केल्याने नको असलेले खर्च आपोआप कमी करण्याचा कल वाढतो.

2) बचत महत्त्वाची

आपल्यापैकी अनेकजण बचत ही सर्व खर्चानंतर करतात. मात्र महिन्याच्या खर्चाचं नियोजन करतानाच काही पैसे जाणीवपूर्वकपणे बचत म्हणून बाजूला काढून ठेवायचे.

3) खर्च कमी करा

वेळेत बिलं भरण्यापासून ते काटकसरीपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला सवयीने सहज शक्य आहेत. मनोरंजन, हॉटेलिंग सारख्या कमी महत्त्वाच्या गोष्टींवर होणारे खर्च टाळा.

4) बचतीचं ध्येय

केवळ बचत करुन भागणार नाही. बचत कशासाठी करत आहोत हे निश्चित ठरवा. ठराविक वेळेनंतर बचत केलेल्या पैशांमधून काय रिटर्नस अपेक्षित आहे याची कल्पना असेल तर बचत अधिक सहजपणे करता येते.

5) नियोजन

महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, कोणत्या गोष्टींना प्रधान्यक्रम दिला पाहिजे हे ठरवा. अगदी संसारिक गोष्टींपासून ते पर्सनल खर्चापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हे प्रायोरिटी ठरवणं फार महत्त्वाचं ठरतं.

6) योग्य निवड

बचत, नियोजन, खर्च या साऱ्यासाठी योग्य पर्याय निवडणे गरजेचं आहे. म्हणजेच बचत करायची झालं तर म्युच्युअल फंडमध्ये की फिक्स डिपॉझिटमध्ये हे आधीच ठरवा.

7) बचतीवर लक्ष ठेवा

बचत केलेल्या पैशांवर किती पैसे रिटर्न मिळत आहेत याकडे लक्ष असू द्या. तुम्ही केलेली गुंतवणूक मृत गुंतवणूक म्हणजेच डेड इनव्हेसमेंट ठरणार नाही याची काळजी घ्या.

8) सवय लावा

बचत करण्याची आणि खर्चाचं नियोजन करण्याची सवय लावा. असं म्हणतात 21 दिवस एखादी गोष्ट केली की त्याची सवय लागते. खर्चाच्या नियोजनाची सवय आधी स्वत:पासून सुरु करा. टप्प्याटप्प्यात घरातील खर्चाबद्दलही असेच नियोजन करा.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story