भारताच्या आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
काही आठवड्यांपूर्वी याच अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान-3 मोहीमेचं प्रक्षेपण करण्यात आलेलं.
मात्र भारतामधील सर्व अंतराळयानं ही श्रीहरीकोटा येथूनच का सोडली जातात तुम्हाला ठाऊक आहे का?
श्रीहरीकोटाची निवड करण्यामागे काही खास कारणं आहेत. त्यावरच टाकलेली ही नजर...
सुरक्षेच्या दृष्टीने श्रीहरीकोटा हे अंतराळामध्ये यानाचं प्रक्षेपण करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे.
सुरक्षा हे श्रीहरीकोटाची निवड करण्यामागील पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे.
श्रीहरीकोटाच्या आजूबाजूला फारशी मानवी वस्ती नाही. त्यामुळे उड्डाणदरम्यान अपघात झाला तर जीवितहानी किंवा मलमत्तेची हानी कमी होईल.
दुसरं महत्वाचं कारण म्हणजे इस्रोचं लॉन्चिंग पॅड असलेलं श्रीहरीकोटा हे विश्ववृत्ताच्या जवळ आहे.
विश्ववृत्त ही एक काल्पनिक रेष असून यामुळे पृथ्वी दोन भागांमध्ये विभागली जाते. विश्वृत्ताजवळच्या ठिकाणावरुन उड्डाण केल्यास यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडणं सहज शक्य होतं.
विश्वृत्ताजवळच्या ठिकाणावरुन उड्डाण केल्यास पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीची मदत यानाला होते आणि कमीत कमी इंधन वापरावं लागतं.
पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती ही विश्ववृत्ताजवळ अधिक असते. त्यामुळे जगातील अनेक अंतराळ केंद्र ही विश्वृत्ताजवळच आहेत.
श्रीहरीकोटा हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे. जवळच बंगालचा उपसागर आहे.
यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून बाहेर पडण्यासाठी बुस्टर्स लावले जातात.
यान एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर हे बुस्टर्स गळून पुन्हा पृथ्वीवर पडतात.
जवळ समुद्र असेल तर हे सुटे झालेले यानाचे भाग समुद्रात पडतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते अधिक फायद्याचं ठरतं.
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे अनेक लॉन्च पॅड पूर्व किनारपट्टीवरच असतात.
श्रीहरीकोटाचं वातावरणही स्वच्छ असतं, आकाश निरभ्र असल्याने इथून लॉन्चिंग सहज शक्य होतं.