जगातील टॉप 10 बिलेनियर्समध्ये मुकेश अंबानींचे नाव घेतले जाते.
फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 116 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.
मुकेश अंबानी यांनी सेंट झेविअर्स कॉलेज आणि हिल ग्रेंज हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं.
मुकेश अंबानी यांनी मुंबई विद्यापीठात केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली. तसेच स्टेनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले.
अनिल अंबानी यांनी केसी महाविद्यालयात सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं. यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हिनियामधून एमबीए केलंय.
मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत.
रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत.
अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते.