कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तो अत्यंत क्लेशकारक योग समजला जातो. कालसर्प दोष म्हणजे एखादी व्यक्ती आयुष्यात मोठी उंची गाठतो तर काही व्यक्तींना बऱ्याच परिणामांना सामोरे जावे लागते.

जर तुमच्या कुंडलीतसुद्धा कालसर्प दोष आहे तर हे उपाय नक्की ट्राय करा.

कालसर्प दोष असल्यास प्रत्येक शिवरात्रीत, श्रावण महिन्यात आणि ग्रहण काळात भगवान शिव यांचा अभिषेक करणं आवश्यक आहे.

तुम्ही नागपंचमीच्या दिवशी गारूड्याला पैसे देऊन नाग-नागिणीच्या जोड्यांची पूजा करून मुक्त केले पाहिजे.

ग्रहणाच्या वेळी नाग आणि नागिन यांची ‘ओम नमोस्तु सर्वभ्यो ये के पृथ्वी पृथ्वीनु। ‘ये दिव्यतेभ्या सर्वपेयो नमः’ या मंत्राने जप करून पाण्यात सोडावे.

कालसर्प दोषापासून मुक्ती हवी असल्यास जर कधी एखादा मृत साप दिसल्यास त्याचे विधीनुसार अंत्यसंस्कार करावेत.यानंतर तीन दिवस सुतक पाळा आणि सापाचा यज्ञ करा.

शनिवारी श्री हनुमानाची ‘ॐ हं हनुमंते रूद्रात्मकाये हुं फट्’ नियमित जप केल्याने देखील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते.

108 नारळांवर चंदनाचा टिळा लावून पीडित व्यक्ती वरून 108 वेळा ‘ओम श्री श्री श्री सराहवे नमः’ जप करत उतरवून घ्या आणि त्यानंतर बुधवारी ते नारळ नदीमध्ये सोडून द्या.

मोराचे किंवा गरूडाचे चित्र काढून त्यावर विषहरण मंत्र लिहा. त्यानंतर या मंत्राचा 10 वेळा जप करून दशांश यज्ञासह ब्राम्हणांना खिरीचे भोजन अर्पण करा.

VIEW ALL

Read Next Story