अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून दररोज लाखो भाविक अयोध्येत दाखल होतायत.

Jan 30,2024


अयोध्येत देशभरातून दररोज सरासरी 2 लाख भाविकांची नोंद करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणारे भाविक राम मंदिरात भरभरुन दानही करतायत.


राम मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसातच 19 लाख भाविकांची नोंद झाली. नऊ दिवसात हा आकडा आणखी वाढला आहे.


23 तारखेला पहिल्याच दिवशी जवळपास 5 लाख भाविकांना प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. तर 28 जानेवारीला साडेती लाख भाविक अयोध्येत होते.


भाविक पैसे सोने-चांदी, दागिने इतकं काय तर चेकच्या स्वरुपात दान देतायत 22 तारखेला उद्घाटनच्या दिवशी 2 लाखांचे चेक आणि 6 लाख रुपये रोख दानपेटीत जमा झाले


त्यानंतर 23 तारखेला 2.62 चेक, 27 लाख रुपये रोख, 24 जानेवारीला 15 लाख रोख, 25 जानेवारीला 40 हजार चेक आणि 8 लाख रुपये रोख, 26 जानेवारीला 1,04,60000 चेक आणि 5.50 लाख रोख दान जमा झालं


27 जानेवारीला 13 लाख रुपयांचे चेक आणि 8 लाख रोख, 28 जानेवारीला 12 लाखांचे चेक आणि रोख तर 29 जानेवारीला 7 लाखांचे चेक आणि 5 लाखांची रोख जमा झाली.


याशिवाय दानपेटीत जमा झालेल्या पैशांची मोजदाद अद्याप बाकी आहे. दररोज तीन लाख रुपयांचं दान दानपेटीत टाकलं जातं, मंदिरात 6 दानपात्र आहेत.

VIEW ALL

Read Next Story