हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय तर सावधान..!

Jan 31,2024


सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेक हेअर रिमूव्हिंग क्रीम , रेझर्स दुकानात उपलब्ध आहेत. वॅक्स वापरूनही केस काढता येऊ शकतात. वॅक्सच्या पर्यायात थोडं दुखू शकतं. त्यामुळे काहींना हा पर्याय पसंत नसतो


हेअर रिमूव्हल क्रीममध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सारखी हानिकारक रसायने असतात.


हेअर रिमूव्हिंग क्रिम प्रत्येकाच्या त्वचेला योग्य ठरेल याची शक्यता नसते. कधीकधी या क्रिममुळे त्वचेवर रॅश, पुरळ उठतात, तर कधी ती त्वचा काळवंडते.


हेअर रिमूव्हिंग क्रिमचा योग्य वापर न केल्यास केमिकल जळण्याची समस्या उद्भवू शकते.


हेअर रिमूव्हिंग क्रिममुळे नको असलेले केस दूर होतात, मात्र त्याचा जास्त वापर केल्याने त्वचेचा आजूबाजूचा भाग काळवंडतो.


त्यामुळे तुम्हीही हेअर रिमूव्हिंग क्रिम वापरत असाल तर आधी पॅच टेस्ट करा आणि तुमच्या त्वचेला निरोगी ठेवा

VIEW ALL

Read Next Story