प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हातात मोबाईल घेत योगी आदित्यनाथ सेल्फी घेताना या फोटोत दिसतायत.

अयोध्या परिसरात वाळूपासून श्रीरामाचं शिल्प साकारण्यात आलं आहे. पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी ही शिल्प साकारलंय. या शिल्पासमोर सीएम योगींनी सेल्फी घेतला.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी सेल्फी घेण्यासाठी ज्या फोनचा वापर केला आहे तो सॅमसंग कंपनीचा आहे.

या फोनचं नाव Samsung Galaxy S23 Ultra असं असून याचे मोबाईलचे फिचर्सही दमदार आहेत.

Samsung Galaxy S23 Ultra मोबाईलमध्ये 200 मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आलाय.

Samsung Galaxy S23 Ultra मोबाईलमध्ये 12 GB Ram आणि 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. या व्हेरिएंटची किंमत 1,24,999 इतकी आहे.

Samsung Galaxy S23 Ultra मोबाईलमध्ये 6.8 इंचीचा Dynamic Amoled 2X डिस्प्ले आहे. हा फोन S Pen सह उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story