आरोग्य विमा ही काळाची गरज असून देशभरात असंख्य लोक भारी प्रीमियम भरुन आरोग्य विमा काढतात. पण देशात असाही एक गट आहे ज्यांना आरोग्य विमा काढण्यासाठी पैसा नसतो.
अशा लोकांसाठी सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजना हाती घेतली आहे. त्या योजनेतर्गंत लाभार्थीला आयुष्मान कार्ड काढायचं आहे. ज्यातून त्यांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येणार आहे.
आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी असून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करु शकता. अर्जात त्रुटी नसल्यास 24 तासांच्या आत तुम्हाला आयुष्यमान कार्ड मंजूर करण्यात येतं.
या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्यरेषेतील म्हणजेच बीपीएल श्रेणीतील लोकांनाच घेता येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्तीचे उत्पन्न कमी किंवा सामाजिक-आर्थिक जात जनगणना (SECC) डेटाबेसमध्ये सूचीबद्ध असलेल्या कुटुंबालाच हे कार्ड मिळणार आहे.
आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://pmjay.gov.in/). आता तुम्हाला स्क्रीनच्या सर्वात वर दिसणाऱ्या Am I Eligible या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफाय करून कॅप्चा भरा. आता Login पर्याय निवडा आणि नंतर Search For Beneficiary वर क्लिक करा. यानंतर तुमचे राज्य निवडा आणि योजनेमध्ये PMJAY लिहा.
आता रेशन कार्डसाठी फॅमिली आयडी, आधार कार्ड किंवा लोकेशन रुरल किंवा लोकेशन शहरी इत्यादी माहिती भरा. तुम्ही आधार कार्ड माहिती किंवा रेशन कार्ड माहिती दिल्यानंतर, तुमच्या कुटुंबाची माहिती स्क्रीनवर पाहिला मिळेल.
यानंतर, तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी आयुष्मान कार्ड बनवायचे आहे त्याचं नाव निवडा आणि त्याच्या तपशीलांची पडताळणी करा. आता आधार पर्याय निवडा आणि OTP द्वारे पडताळणी करा.
OTP सत्यापित केल्यानंतर, प्रमाणीकरण पृष्ठ ओपन होईल. येथे आयुष्मान कार्ड अर्ज सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, एक नवीन पेज आपोआप उघडेल जिथे तुम्ही e-kyc पर्याय निवडा.
ई-केवायसीसाठी, तुम्हाला आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. ई-केवायसी केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सबमिट करा.
यानंतर मोबाईल क्रमांक, नातेसंबंध, पिन कोड, राज्य, जिल्हा, ग्रामीण किंवा शहरी, गाव इत्यादी माहिती द्या आणि सबमिटवर क्लिक करा. अशा प्रकारे आयुष्मान कार्डसाठी अर्ज सादर होईल.