मुघल सम्राटांनी 16 व्या शतकापासून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतावर शासन चालवलं.
कोणत्या मुघल बादशाहने किती काळ गादी संभाळली? हे जाणून घेऊया.
मुघल साम्राज्याची सुरुवाच बाबरने (1483 ते 1530) केली. 47 व्या वर्षी त्याचे एका आजाराने निधन झाले.
बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट हुमायू (1508 ते 1556) 47 वर्षे जगला. पायऱ्या चढताना पडल्याने अचानक त्याचा मृत्यू झाला.
अकबर (1542 ते 1605) हा मुघल सम्राटांमध्ये सर्वात प्रसिद्ध सम्राट होता. त्याने 49 वर्षे शासन केलं. 63 व्या वर्षी पेचिसच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
जहांगीर (1562 ते 1627) हा अकबराचा मुलगा. त्याने 22 वर्षे शासन केलं. दारु आणि अफीमच्या अतीसेवनामुळे 58 व्या वर्षी त्याची तब्येत बिघडली आणि मृत्यू झाला.
शाहजहा (1592 ते 1666) ला ताजमहालसाठी ओळखले जाते. त्याने 30 वर्षे शासन केले. मूत्र रोगाने 74 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
औरंगजेब (1618 ते 1707) हा सर्वात जास्त काळ शासन करणारा बादशहा. त्याने 49 वर्षे राज्य केलं. 88 वर्षाचा असताना बुंदेलचा राजा वीर छत्रसालने त्याला युद्धात मारले.
या मुघल सम्राटांनी आपल्या शासन काळात भारतीय संस्कृती इतिहासाला नवे रुप आणि आकार देण्याचा प्रयत्न केला.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)