बँकेत ठराविक रक्कम जमा करण्यासमवेत काही रक्कम एफडी खात्यावर जमा करत त्यातून तगडा परतावा मिळवण्याकडे अनेकांचाच कल असतो.
देशातील विविध बँका एफडी अकाऊंटवर विविध प्रमाणात आणि टक्केवारीच्या आधारे व्याज देतात. HDFC बँकेकडून 11 महिन्यांच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रमाण 7.85 टक्के इतकं आहे.
HDFC सर्वाधिक 7.40 टक्के व्याज 4 वर्ष, 7 महिन्यांच्या एफडीवर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रमाण 7.90 टक्के इतकं आहे.
ICICI कडून 15 ते 18 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के आणि जेष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळतं.
पंजाब नॅशनल बँक 400 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत असून, जेष्ठांसाठी हा आकडा 7.75 टक्के इतका आहे.
बँक ऑफ बडोदाकडून 399 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आकडा 7.75 टक्के इतका आहे.