हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्व आहे.यादिवशी नागदेवताची पूजा केली जाते.
यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. नागदेवतेची पूजा कऱण्यासाठीचा शुभ मुहूर्त 05.47 ते 08.27 पर्यंतचा राहील.
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
शास्त्रानुसार या दिवशी काही गोष्टी करणं निषिद्ध मानली जातात.
यादिवशी सापांना हानी पोहचेल असं काही करू नये.
नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे देखील निषिद्ध मानले जाते.यामुळे वंशाची हानी होते असा समज आहे.
त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तू जसं की चाकू, सुई यांचा वापर टाळावा.
या दिवशी तवा किंवा लोखंडामध्ये जेवण बनवू नये.
या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका. त्याऐवजी सापाच्या पुतळ्याला दूध अर्पण करू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)