एफडीवर 9 टक्क्यांहून जास्त व्याज देणाऱ्या बॅंक!

एफडीची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. सिनीअर सिटीझन्सना जास्त व्याज दिले जाते.

एचडीएफसीकडून 18 ते 21 महिन्यात मॅच्योर होणाऱ्या एफडीवर 7.25 टक्के व्याज मिळते.

एसबीआय 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर 7 टक्के व्याज देते.3 ते 5 वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देते.

आयसीआयसीआय बॅंक 12 ते 15 महिन्याच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज देते. 15 महिने ते 2 वर्षापर्यंतच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज देते.

स्मॉल फायनान्स बॅंक या नॅशनल बॅंकांपेक्षा जास्त व्याज देतात. त्यांचे व्याजदर जाणून घेऊया.

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बॅंक सर्वसामान्यांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 9.25 टक्के आहे.

शिवालिक स्मॉल फायनान्स बॅंक 3.50 टक्के ते 8.70 टक्के इतके व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देते.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्याजदर 3.75 टक्के ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. 15 महिन्याच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज आणि सिनिअर सिटीझनसाठी 9 टक्के व्याज देते.

सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक 4 टक्के ते 9 टक्क्यांदरम्यान व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 4.40 टक्के ते 9.25 टक्क्यांदरम्यान आहे.

VIEW ALL

Read Next Story