पावसाळ्यात ओलाव्यामुळे बाथरुम टाइल्सवर फंगस पकडते. यामुळे टाइल्स काळी होते. दिवाळीआधी हे स्वच्छ करणे आवश्यक आहे.
बाथरुम स्वच्छ न केल्यास बॅक्टेरीया आणि किटाणू वाढतात. त्यामुळे साफसफाईची सुरुवात बाथरुम क्लिनिंगपासून करावी.
टॉयलेट सीट तर सर्व साफ करतात पण टाइल्सच्या कोपऱ्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे टाइल्स घाण होतात आणि त्याच्यावर फंगस तयार होतात.
बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.
बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते.
संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका.
यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
एक वाटी बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करा. यानंतर टाइल्सवर लावा आणि 5-10 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसल्यास टाइल्स पांढरी शुभ्र दिसेल.
सारखे फंगस पकडण्याच्या समस्येतून सुटायचे असेल तर बाथरुममध्ये अॅडजस्ट फॅन लावा. यामुळे हवा खेळती राहील आणि ओलावा राहणार नाही.