'या' सुंदर राणीने तिरुपती मंदिराला 23 एकर जमीन आणि सर्व दागिने तिरुपती मंदिराला केले होते दान


गेल्या काही दिवसांपासून तिरूपती बालाजी मंदिर चर्चेत आहे.


भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात चरबी असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय.


पण या धार्मिक स्थळ आणि प्रसिद्ध मंदिराबद्दल अनेक ऐतिहासिक कथा आहेत.


तिरूपती मंदिर हे 300 AD मध्ये तोंडाईमंडलम राज्याचा राजा थोंडाइनम यांच्या काळात बांधलं गेलं.


यावेळी मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक राजांनी मौल्यवान दागिने आणि इतर वस्तू दान केल्यात.


पण तिरुपती मंदिराला सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये पल्लव साम्राज्याची राणी समवईचं नाव अग्रस्थानी आहे.


इतिहासकारांच्या मते, राणी श्रीकांदवन पेरूणदेवी जिला समवाई या नावाने ओळखलं जातं.


या राणीने सर्व दागिने शिवाय 23 एकर जमीनही मंदिराला दान केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार तिरुपती मंदिरात स्थापित भोग श्रीनिवासाची मूर्तीही राणीने दिली होती.


तिरुपतीमध्ये महाराणी समवईच्या नावाने एक रस्ताही बांधण्यात आला असून, त्याचं उद्घाटन काही दिवसांपूर्वीच करण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story