G20 परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यापासून फ्रान्स, जपान देशाचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते. पण सर्वाधिक चर्चा झाली ती ब्रिटनेचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीची.

Sep 12,2023


ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती G20 परिषदेदरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अक्षात मूर्ती इंडो-वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसल्या.


अक्षता मुर्ती पती ऋषी सुनक यांच्यासोबत जेव्हा भारतात पोहचल्या. त्यावेळी त्यांनी जो ड्रेस परिधान केला होता तो जुना होता. याआधीही एका कार्यक्रमात त्या या ड्रेसमध्ये दिसल्या होत्या.


बिझनेसवुमन असलेल्या अक्षता मूर्ती यांनी आपल्या साध्या राहणीमानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतात दाखल झाल्या त्यावेळी अक्षता मूर्ती यांनी व्हाईट शर्ट आणि मल्टिकलर फ्लोरल लाँग स्कर्ट परिधान केला होता.


हा मल्टिकलर फ्लोरल स्कर्ट अक्षता मूर्ती यांनी याच वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या पद्म पुरस्कार कार्यक्रमात परिधान केला होता. त्यांची आई सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.


या कार्यक्रमात अक्षता यांनी मिडनाईट ब्ल्यू रंगाचा डॉटेड ड्रेप आणि हाच मल्टिकलर फ्लोरल स्कर्ट घातला होता.


संपूर्ण भारत दौऱ्यात अक्षता मूर्ती यांचं अत्यंत साधं राहणीमान पाहिला मिळालं. या दौऱ्यात त्यांनी अगदी स्वस्तात मिळणारा फ्लोअर ड्रेसही परिधान केला होता.


अक्षता मूर्ती या इंफोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. याशिवाय त्यांचे पती ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. स्वत: अक्षता मूर्ती या अरबपती बिझनेवुमन आहेत.

VIEW ALL

Read Next Story