काय आगरकर अन् काय कुंबळे... 'या' यादीत कुलदीपने सर्वांनाच टाकलं मागे

4 विकेट्स घेत अनोखा विक्रम

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्धच्या 'सुपर-4'च्या सामन्यात 4 विकेट्स घेत अनोखा विक्रम नोंदवला आहे.

2 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स

कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 2 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या.

कुलदीप पहिल्याच ज्याने...

या 9 विकेट्सच्या जोरावर कुलदीप हा सर्वात कमी सामन्यांमध्ये 150 विकेट्सचा टप्पा गाठणारा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

पाचव्या स्थानी रविंद्र जडेजा

150 विकेट घेणाऱ्या डावखुऱ्या हाताच्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी रविंद्र जडेजा असून त्याने ही कामगिरी 125 सामन्यांमध्ये केली.

जडेजापेक्षा सरस हा बांगलादेशी

जडेजापेक्षा सरस कामगिरी बांगलादेशचा डावखुरा गोलंदाज शाकिब अल हसनने केली असून त्याने 119 सामन्यांमध्ये 150 बळी घेतले आहेत.

ब्रॅड हॉगही यादीत

तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगने 118 सामन्यांमध्ये 150 विकेट्स घेतल्यात. अब्दुल रजाक या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याने 108 सामन्यांत ही कामगिरी केली आहे.

कुलदीप पहिल्या क्रमांकावर

सर्वात कमी सामन्यांमध्ये 150 विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ही कामगिरी 88 सामन्यांमध्ये केली.

कुलदीप दुसऱ्या स्थानी

सर्व फिरकी गोलंदाजांचा विचार केला तर कुलदीप दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 78 सामन्यांमध्ये 150 विकेट्सचा टप्पा गाठला.

भारतीयांमध्ये पहिल्या क्रमाकांवर शामी

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल्यास केवळ मोहम्मद शामीने कुलदीप यादवपेक्षा सरस कामगिरी केली आहे. शामीने 80 सामन्यांमध्ये 150 गडी बाद केलेत.

सध्याच्या निवड समिती प्रमुखांनाही टाकलं मागे

कुलदीपने सध्याचे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीच्या मदतीने मागे टाकलं आहे. आगरकरने 97 सामन्यांमध्ये 150 गडी टीपले होते.

कुंबळे, जहीर अन् पठाणही यादीत

या यादीमध्ये जहीर खानही असून त्याने 103 तर अनिल कुंबळेने 106 सामन्यांमध्ये 150 विकेट्सचा टप्पा गाठला होता. कुंबळेबरोबरच इरफानलाही हा टप्पा गाठायला एवढेच सामने लागले होते.

VIEW ALL

Read Next Story