सुरक्षा व्यवस्थेत पोहोचले मंदिरात

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले.

पुजाऱ्यांनी केले स्वागत

स्वामी नारायण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि मुख्य मंदिरात नेऊन पूजा केली.

पत्नीसाठी सुनक यांनी पकडली छत्री

मंदिरपरिसात हलका पाऊस पडत असल्यामुळे सुनक आणि त्याची पत्नी अक्षता मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.

दर्शनासाठी मागितली होती वेळ

ऋषी सुनक यांनी दर्शनासाठी मंदिराच्या संचालाकांकडे वेळ मागितला होता. त्यावर संचालकांनी तुम्हाला वाटेल तेव्हा येऊ शकता असे म्हणाले. सुनक यांना मुख्य मंदिर पाहायचे होते.

पत्नीसह सुनक यांनी केली प्रार्थना

ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली. संतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली. त्यांच्या पत्नीनेही प्रार्थना केली.

पुन्हा दर्शनाची व्यक्त केली इच्छा

मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन, असेही पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे.

अनवाणीच फिरले संपूर्ण परिसर

सुनक यांनी मुख्य मंदिरात वेळ घालवला. त्यांनी मंदिराबाहेर चपला काढल्या आणि अनवाणीच पुढे निघाले होते. (सर्व फोटो - ANI)

VIEW ALL

Read Next Story