अनेकजण घरी पक्षी पाळतात. ते उडून जाऊ नये म्हणून पिंजऱ्यात बंद करतात.
हे शुभ आहे की अशुभ? वास्तू शास्त्र याबद्दल काय सांगते? याबद्दल जाणून घेऊया.
हिंदु धर्मात पक्षांना दाणा-पाणी टाकणं शुभ मानलं जातं. यामुळे सुख-समृद्दी प्राप्त होते.
पण अनेक लोक पक्षांना घरी कैद करुन ठेवतात.
घरी पिंजऱ्यात पक्षांना ठेवल्यास आरोग्यावर परिणाम होतो आणि नकारात्मकता घरी येते.
कुंडलीवर याचा परिणाम होतो. अनेक समस्या जन्म घेतात.
पोपट पिंजऱ्यात ठेवल्यास बुध ग्रह कमजोर होतो आणि निर्णय घेण्यास अडचणी येतात.
पिंजऱ्यात पक्षी ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात अनेक समस्या येऊ शकतात.
पक्ष्यांना बंद करुन ठेवण्याऐवजी खुल्या हवेत सोडायला हवे. यामुळे ते जगतात आणि आपल्यावर वाईट प्रसंगही येत नाहीत.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)