आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीत अनेक विषयांबद्दल लिहून ठेवलं आहे.
आचार्य चाणक्य यांनी विवाहाबद्दल आणि पती-पत्नीच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही सांगितले आहे.
लग्न करताना मुलीचे वय मुलापेक्षा कमीच हवे, असं सांगितले जाते. मात्र आता काळ बदलला आहे.
लग्न करताना वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याबाबतही आचार्य चाणक्य यांनी काय म्हटलंय पाहा
वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याचे एक फायदा म्हणजे त्या वयानुसार जास्त परिपक्व व समजुतदार असतात. घर सांभाळण्यासाठी त्या अधिक सक्षम असतात.
वयाने मोठ्या असलेल्या मुली आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी असतात. एखादे आर्थिक संकट कोसळल्यास त्यावर खचून न जाता त्या कुटुंबाला आधार देतात. बजेटचे व्यवस्थापनही त्यांना करता येते
वयानुसार परिपक्वता येते असे म्हणतात त्यामुळं मुलांना वळण लावण्यात व त्यांच्यासंबंधीत गोष्टीदेखील त्या योग्य प्रकारे हाताळतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)