होळीला मधुमेहाचे रुग्णही बिनधास्त खाऊ शकतात 'हे' गोड पदार्थ

सण म्हणजे गोड पदार्थ आलेच. होळीला पुरणाचा स्वयंपाक आवर्जून केला जातो.

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे. शुगरच्या समस्येमुळं गोड पदार्थ खाऊ शकत नाहीत.

गोड खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. अशावेळी आम्ही आज तुम्हाला शुगर फ्री मिठाईंबाबत सांगणार आहोत. ज्या मधुमेहाचे रुग्णही खावू शकतात.

बदामची बर्फी

बदामाची बर्फी तुम्ही खावू शकता हल्ली बाजारात शुगर फ्री बदामाची बर्फी मिळते. ही बर्फी ओव्हनमध्ये बेक करुन बनवली जाते

चॉकलेट कोकोनट मूस

नारळाचे मूस, चॉकलेट, अंड आणि फेटलेली क्रिमने तयार केली जाणारी हि मिठाई शुगर फ्री असते.

फिरनी

हे राइस पुडिंग बदाम, दूध, वेलची पावडर टाकून बनवले जाते. यात पिस्ता किंवा गुलाब इसेन्स टाकले जातात. मधुमेहाचे रुग्णदेखील ही मिठाई खाऊ शकतात.

गिल्ट फ्री मोदक

मेवा, सुका मेवा आणि नॅचरल स्वीटपासून ही रेसिपी बनवली जाते. हे मोदक तुम्ही बिनदिक्कत खावू शकता.

शुगरफ्री चीज केक

साखर न वापरता हा चीजकेक बनवला जातो. या क्रीमी चीजकेक prunes (आलुबुखार) चा गोडवा आणि कॉफीचा कडवटपणा या दोन्ही मिश्रणासोबत येतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story