काँग्रेस खासदार राहुल गांधी एकदिवसाच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचा अनोखा अंदाज पाहिला मिळाला

राहुल गांधी जयपूरमधल्य महाराणी कॉलेजमध्ये गेले होते, तिथून त्यांना हाऊसिंग बोर्ड इथे सभेसाठी जायचं होतं. यावेळी त्यांनी एका विद्यार्थिनीकडे लिफ्ट मागितली.

या विद्यार्थिनीबरोबर राहुल गांधी यांनी चक्क स्कुटीवरुन प्रवास केला. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती.

जयपूरमध्ये राहुल गांधी यांचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वागत केलं. यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे.

त्याआधी राहुल गांधी हमालाच्या वेषात दिसले. नवी दिल्ल्यातल्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर राहुल गांधी यांनी अचानक भेट दिली आणि तिथल्या हमालांची भेट घेतली.

यावेळी राहुल गांधी यांनी हमालाचं शर्ट घातलं. तसंच डोक्यावर बॅग घेऊन ओझंही वाहिलं. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

VIEW ALL

Read Next Story