खरेदी केलेलं सामान रिटर्न घ्यायला दुकानदार देतो नकार? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा!

Pravin Dabholkar
Nov 20,2024


एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण दुकानात जातो. जिथे तुम्हाला वेगवेगळ्या नियमांच्या पाट्या वाचायला मिळतात.


काही पाट्या नियमात बसणाऱ्या असतात तर काही पाट्या नियमबाह्य असतात, पण बऱ्याचदा आपल्या ते लक्षात येत नाही.


तुम्ही अनेक दुकानांमध्ये एक पाटी पाहिली असेल, ज्यावर लिहिलेलं असतं, 'एकदा विकलेलं सामान परत घेतलं जाणार नाही.'


त्यामुळे त्या दुकानातून घेतलेली वस्तू कोणी परत करायला जात नाही.


पण तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे पाटी लिहिणेदेखील बेकायदेशीर आहे.


ग्राहक संरक्षण नियम 1968 नुसार, 'विकलेलं सामान पुन्हा घेणार नाही' असे दुकानदार म्हणू शकत नाही.


कोणता दुकानदार असे म्हणत असेल तर तुम्ही त्याची तक्रार ग्राहक कल्याणचा टोल फ्री क्रमांक 1915 वर करु शकता.


याव्यतिरक्त तुम्हा ग्राहक तक्रार निवारणच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.



जर कोणता दुकानदार असे करत असेल आणि त्याची तक्रार प्राप्त झाली तर त्याला दंड ठोठवण्यात येऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story