लोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या

आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात.

म्हणजेच त्यांना प्रवास करायचो नसतो. तरीही ते पैसे देऊन तिकीट खरेदी करतात. लोक विनाकारण पैसे का खर्च करतात हे ऐकून नक्कीच विचित्र वाटेल. पण ते खरे आहे.

हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव दयालपूर रेल्वे स्थानक आहे. लोक या स्थानकावर तिकीट खरेदी करतात, परंतु ट्रेनमध्ये प्रवास करत नाहीत.

1954 मध्ये दयालपूर येथे रेल्वे स्थानक बांधले गेले. हे स्थानक उभारण्यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान होते.

स्थानकाच्या निर्मितीनंतर लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे झाले. जवळपास 50 वर्षे रेल्वे स्थानकावर सामान्य कामकाज चालू होते. त्यानंतर 2006 मध्ये हे रेल्वे स्थानक बंद करण्यात आले.

दयालपूर रेल्वे स्थानकावर फार कमी लोक तिकीट काढत असत. यामुळे रेल्वेचे नुकसान होत होते. नंतर हे स्थानक बंद करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर 2020 मध्ये दयालपूर रेल्वे स्थानक पुन्हा सुरू करण्यात आले.

स्थानक पुन्हा बंद करू नये, त्यामुळे ते तिकीट काढून प्रवास करत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

VIEW ALL

Read Next Story