अतिशी यांना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले आहे.
त्यांनी आपले शालेय शिक्षण नवी दिल्लीच्या स्प्रिंगडेलमधून पूर्ण केले.
यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस काँलेजमधून हिस्ट्री ऑनर्समध्ये बॅचलर डिग्री घेतली.
1998 ते 2001 मधील कामासाठी अतिशी यांना राज्यपाल मेमोरियल अॅवार्ड दीपचंद स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.
2001 मध्ये चेवेंगिन स्काँलरशिपमधून विदेशात शिक्षणाची संधी मिळाली. लंडन येथून त्यांनी प्राचीन आणि आधुनिक इतिहासात मास्टर्स केले.
भारतात परतल्यावर त्यांनी आंध्र प्रदेशच्या ऋषी वल्ली शाळेत 1 वर्षे शिकवले. 2005 मध्ये रोड्स स्काँलरशीपसाठी त्या पुन्हा लंडनला गेल्या.
2005-06 मध्ये त्यांनी ऑक्सवर्ड विद्यापीठातून एज्युकेशन रिसर्चवर मास्टर केले.
2015 मध्ये मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात जल सत्याग्रह केला.
2012 मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. यावेळी आम आदमी पक्षाची स्थापना झाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर विरोधात उभ्या राहिल्या. पण त्या हरल्या.
2020 विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या कालकाजीमधून उभ्या राहिल्या आणि आमदार बनल्या.
आता दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.