जेवण बनवताना काहीवेळा गडबडीत त्यात लाल तिखट जास्त पडतं. ज्यामुळे पदार्थ खूप जास्त झणकेदार तिखट बनतो.
जास्त तिखट खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही, यामुळे पोटाच्या समस्या जाणवू शकतात.
तेव्हा घाई गडबडीत जेवणात तिखट जास्त झाल्यास 5 टिप्स उपयोगी ठरू शकतात.
शेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून या टिप्स सांगितल्या आहेत.
डाळ किंवा कोणत्या अन्य पदार्थांमध्ये तिखट जास्त पडलं तर तुम्ही तिखटपणा कमी करण्यासाठी डेअरी प्रॉडक्टचा वापर करू शकता.
रस्सा भाजीमध्ये तिखट जास्त पडलं तर तुम्ही दही घालू शकता. तर सुक्या भाजीत देशी तूप घालू शकता.
रस्सा भाजीमध्ये तिखटपणाला कमी करण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा उपयोग करू शकता.
नारळाचं दूध फक्त तिखटपणाचं नाही तर जेवणाचा स्वाद सुद्धा वाढवते.
तिखट झालेल्या पदार्थात थोडी साखर किंवा गूळ घालून जेवणातील अति तिखटपणा कमी करू शकता.
लिंबाचा रस तिखटपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
बटाट्याच्या मदतीने तुम्ही तिखटपणा दूर करू शकता. यासाठी एक किंवा दोन उकडलेले बटाटे भाजीत टाका. यामुळे तिखटपणा बटाटा शोषून घेतला जातो.