मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई हे देशातील यशस्वी उद्योगपती होते. त्यांनी शिकवलेले गुण तुम्ही आत्मसात केले तर यशाच्या शिखरावर पोहोचू.
तुम्हालादेखील आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर धीरुभाईंची ही शिकवण, गुण लक्षात ठेवायला हवेयत.
तुमची स्वत:ची स्वप्न पूर्ण करा. नाहीतर दुसरा कोणीतरी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवेल.
मोठा विचार करा, वेगवान विचार करा, भविष्याचा विचार करा. विचारांवर कोणाचा मालकी हक्क नसतो.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची चूक नाही पण गरीब म्हणून मेलात तर तुमची चूक आहे.
प्रगती करण्यासाठी तुम्हाला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही.
कठीण काळातही तुमचे ध्येय सोडू नका. असे केल्यास तुम्ही अडचण संधीमध्ये बदलू शकता.
नकारात्मकतेला आव्हान द्या. याने स्वत:बद्दल दृढ विश्वास येईल आणि आत्मविश्वास वाढेल.
आव्हानांशी लढत नाही तोपर्यंत व्यक्ती यशस्वी होत नाही. एक चांगला उद्योजक आव्हानांमुळेच मजबूत बनतो.