हॉटेल बुक करताना त्या व्यक्तीला आधारकार्ड मागितला जातो. आधारकार्ड नसल्यास रुम बूक होणार नाही असं सांगितलं जातं.
कधी शहरातील शहरात किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी अनेक जोडपी जातात. अशावेळी हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड मागितले जाते.
आधार कार्ड हे सरकारी आणि महत्त्वाचे आयडी आहे. आधारकार्डद्वारे आपलं वैयक्तीक्त डेटा हा लीक होण्याची भीती असते.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबद्दल महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार हॉटेल बुक करताना आधार कार्ड देणे बंधनकारक नाही.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे. त्याशिवाय आधारकार्ड हे आपल्या महत्त्वाच्या अनेक ठिकाणी लिंक केलेलं असतं. त्यामुळे ते कुठेही देताना शंभर वेळा विचार करा.
हॉटेल बुक करताना तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा व्होटर आयडी देऊ शकता. यापुढे तुम्ही जर हॉटेल बुक करत असाल आणि तुमच्यासोबत पत्नी किंवा गर्लफ्रेंड असेल तर त्यांचं आधारकार्ड हॉटेल व्यवस्थापनाला देऊ नका.