मासे खाताना घशात काटा अडकला तर काय करावे?
मासे खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
दृष्टी वाढते, शरीर मजबूत करणे आणि त्वचा निरोगी राहते, असे मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
वजन कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत होते.
माशाचे इतके फायदे असूनही काही लोक ते खाणे टाळतात, कारण त्यांना घशात काटा अडकण्याची भीती वाटते.
माशाचा काटा घशात अडकला तर समस्या खूप वाढतात. अशा परिस्थितीत मासे खाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
फिश खाताना काटा घशात अडकल्यानंतर काय करावे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
माशाचा काटा घशात अडकला तर भाताचा गोळा न चावता गिळा. यामुळे काटा घशातून खाली सरकतो. हा प्रकार दोन तीन वेळा करा.
माशांचा काटा घशात अडकल्यावर पुरेसे पाणी प्यावे. याशिवाय तुम्ही इतर पेयेदेखील पिऊ शकता.
घशात काटा अडकलेला असेल तर केळी खा. केळी न चावता खाली तर तुम्हाला फायदा होईल.
या उपायाने फायदा झाला नाही तर डॉक्टरांना भेटा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सर्वसामान्य आधारित आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)