अनेकदा मोबाईल लवकर चार्ज करायचा असतो पण तसं होत नाही. अशावेळेस काय करावं जाणून घ्या...
आपला फोन अगदी वेगाने चार्ज व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. खास करुन जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा तर अनेकदा फोन लवकर चार्ज का होत नाही असं वाटतं.
मात्र तुमचा फोन वेगाने चार्ज व्हावा असं वाटत असेल तर काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
फोन वेगाने चार्ज होण्यासाठी काय करावं यासंदर्भातील काही खास टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टीप्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
एरोप्लेन मोडचा मूळ वापर स्मार्टफोन वेगाने चार्ज करण्यासाठी नाही. मात्र हा मोड ऑन केल्यास फोनचे इतर सारे फंक्शन बंद होतात.
एरोप्लेन मोडमध्ये फोनचं इंटरनेट कनेक्शनही बंद होतं. त्यामुळे कनेक्शन सर्चिंगसाठी लागणारी ऊर्जा फोन वापरत नाही.
एरोप्लेन मोडवर ठेऊन फोन चार्ज केल्याने तो वेगाने चार्ज होतो. एकदा हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही.
स्क्रीनचा ब्राइटनेस फार अधिक असेल तर फोनची बॅटरी लवकर उतरते. ब्राइटनेस कमी केल्याने स्क्रीनसाठी कमी बॅटरीचा वापर होतो.
स्क्रीन ब्राइटनेस अधिक असेल तर बॅटरी चार्ज होण्यास अधिक वेळ आणि वीज खर्च होते.
फोन चार्ज करताना अॅप्लिकेशन्स बंद करुन ठेवा. अॅप्लिकेशन बंद करुन ठेवल्यानेही मोबाईल वेगाने चार्ज होतो.
अॅप्लिकेशन बंद असल्याने वेगाने मोबाईल चार्ज होण्यामागील कारण म्हणजे हे अॅप्लिकेशन बॅकग्राऊण्डलाही काम करत नाही. त्यामुळे अॅप्लिकेशन न वापरणे म्हणजे पॉवर सेव्हिंग मोडवरच फोन चार्ज करण्यासारखं आहे.
एरोप्लेन मोडबरोबर डू नॉट डिस्टर्ब मोडही फोनचे सर्व नोटीफिकेशन बंद करतो. त्यामुळे कमी प्रमाणात फोनची बॅटरी खर्च होते.
स्मार्टफोनचा आवाज आणि व्हायब्रेशनसाठी मोठ्याप्रमाणात बॅटरीचा वापर होतो. त्यामुळेच जेव्हा कमी वेळात स्मार्टफोन चार्ज करायचा असतो तेव्हा डू नॉट डिस्टर्ब मोड हा चांगला पर्याय ठरतो.
स्मार्टफोन चार्ज करताना तो वापरु नये असं सांगितलं जातं. तसेच फार आवश्यकता नसेल तर फोन चार्ज होईपर्यंत स्वीच ऑफ केला तर तो लवकरच चार्ज होतो.
स्मार्टफोन वेगात चार्ज करण्यासाठी तो बंद करुन चार्ज करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे बॅटरी पूर्णक्षमतेनं चार्ज होते. म्हणूनच स्वीच ऑफ करुन फोन चार्ज केल्यास तो वेगात चार्ज होतो.