केचअप

केचअपमध्ये अनेक प्रिजर्वेटिव्हज असतात ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. शेवटी ते एक प्रोडेक्ट आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानं ते खराब होण्याची शक्यता असते.

चॉकलेट

जास्त वेळ चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्याच्यावर एक पांढरा थर आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे चॉकलेटच्या चवीवर परिणाम होऊ शकतो.

टॉमेटो

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवले की ते फारच मुळमुळीत आणि ओले होते. ते धड चिरताही येत नाही.

ब्रेड

फ्रीजच्या वातावरणात ब्रेड ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता असते. त्यातून त्याचा रंग बदलू शकतो आणि त्यातून चुराही पडू शकतो. अंडीही फ्रीजमध्ये न ठेवलेली शक्यतो बरी असतात.

कॉफी

कॉफी ही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजच्या थंड वातावरणामुळे कॉफी खराब होते आणि तिची चवही बदलते.

VIEW ALL

Read Next Story