कोण आहे ही व्यक्ती?

ही गोष्ट आहे झोहो कॉर्पोरेशनचे मालक श्रीधर वेंबू यांच्याबद्दल. त्यांची कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन सर्व्हिस देते.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म

तामिळनाडूचे रहिवासी असलेले श्रीधर वेंबू मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. श्रीधर वेंबू यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेतून पूर्ण केले.

अमेरिकेत पूर्ण केली पीएचडी

1989 मध्ये आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर वेंबू पीएचडीसाठी अमेरिकेला रवाना झाले.

अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात

अमेरिकेत पीएचडी करत असताना त्यांनी क्वालकॉममध्ये काम केले. त्यानंतर ते भारतात परतल्याने अनेकांना धक्का बसला. श्रीधर वेंबू यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता.

गावात बांधले ऑफिस

1996 मध्ये श्रीधर वेंबू यांनी त्यांच्या भावासोबत अॅडव्हेंटनेट ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सुरू केली. 2009 मध्ये या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन केले. ही कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन सर्व्हिस देते.

हजारो कोटींचा महसूल

श्रीधर वेंबू हे झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एका अहवालानुसार, या कंपनीचा महसूल 1 अब्ज डॉलर म्हणजेच 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

वेंबू यांचे सायकल प्रेम

श्रीधर अजूनही जमिनीशी जोडलेले आहेत. त्यांना आजही सायकल चालवायला आवडते.

गावातील लोकांची मदत

तामिळनाडूच्या ग्रामीण भागात असलेल्या तेनकासी येथे श्रीधर यांनी कंपनीचे मुख्य कार्यालय उघडले. लोकांना कॉम्प्युटरचे ज्ञान देण्यासाठी शाळाही सुरू करण्यात आली. या शाळेत शिकलेल्या मुलांना आता त्यांच्या कंपनीतच नाही तर इतर मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतात.

VIEW ALL

Read Next Story